एके दिवशी , सकाळी जेव्हा गजानन सरोदे नेहमीप्रमाणे अलार्मच्या आवजाने स्वप्नातून जागा झाला तेव्हा त्याच्या लक्षात आले कि अलार्मचा आवाज त्याच्याच छातीतून घऱघऱत येत होता . त्याचे हात पाय त्याच्या शरीरालाच जखडले होते . त्याने डोळे उघडले तेव्हा त्याचा चेहरा एकदम प्रकाशमान झाला . त्याच्या असे लक्षात आले की तो एक पारदर्शक पडद्या आडून जगाकडे पाहत आहे . त्याचा चेहरा, छाती आणि पोट यांचे रूपांतर एका संवेदनशील 'टच स्क्रीन ' मध्ये झाले आहे . एका वायरी मधून त्याच्यामध्ये चैतन्य पुरवठा होत असून आता पूर्णपणे चार्ज झाल्यामुळे एकप्रकारची तृप्तीची भावना त्याच्या शरीरातून वहत आहे . परन्तु कोणी तरी स्विच ऑफ केले नाही तर लवकरच अत्यधिक उष्णतेने आपले नुकसान होईल असा विचार त्याच्या मनात आला . मात्र वरिष्ठांच्या हुकुमशिवाय कुठलाही निर्णय घ्यायचा नाही ही सवय त्याला पुर्वी पासून असल्याने त्याने कुठलीही हालचाल केलि नाही .
" च्युत मरीच्या , हे काय होऊन बसलय माझं !" गजा स्वतःशी म्हणाला . ( त्याच्या कामाच्या स्वरूपामुळे त्याला बोलताना शिव्यांचा वापर करता येत नसे . त्यामुळे स्वतःशी बोलताना तो नेहमी आपली शिवराळपणाची हौस भागवून घ्यायचा . ) हे स्वप्न असावे किंवा रात्रीची उतरली नसावी अशीही शंका त्याला आली . पण ते स्वप्न नव्हते . त्याच्या खोलीच्या छताचा तोच तो चिरपरिचित विटलेला रंग , तोच आवाज करीत खड़खड़ फिरणारा पंखा . तीच त्याची विरलेली चादर आणि जागोजागी फुगलेली गादी . छताकडे तोंड असल्याने त्याला भींती व्यवस्थित दिसत नव्हत्या मात्र समोरच्या भिंतीवरील मासिकातून कापलेले कटरीना कैफचे शीतपेय पितांनाही लैगिक हावभाव करणारे चित्र त्याला अंधुक दिसत होते .त्याने डोळ्यांच्या कोपऱ्यातून खिडकीकडे पाहिले . खिडकीच्या लोखंडी चौकटीतून पावसाचे तुरळक थेम्ब टपटपत होते . हवेत सुखद गरवा होता . "च्यमारी , झोपावं थोड़ा वेळ अजुन . सगळाच मूर्खपणा . होऊन जाऊ दे काय व्हायचे असेल ते!" गजा स्वतःशी म्हणाला . पण त्याला एक कुशिवार झोपल्याशिवाय झोप येत नसे . आता तर त्याचा आकर चांगलाच
पसरट आणि चपटा झाला होता . शिवाय त्याला स्वतःहून हलताही येईना .
"कायपण नौकरी आहे येडझवी. सारख फिरतीवर राहायचं . मिळेल ते खायचं , दिवस भर ट्राफिकने जीव नको नको होऊन जातो . त्यात ती गाड्यांची वेळापत्रकं सांभाळा , सतरा जणांच्या अप्पोइंटमेंटि घ्या . रिमाइंडर लावा , सतत खिशात फोन वाजतोय ,नाहीतर मेसेज तरी येतोय , आता तर स्वतःच फोन झाल्यासारखं वाटतय . " गजा स्वतःशी करवदला.
थोडावेळ डोळे मिटून त्याने पुन्हा डोळे उघडले . " उठावंच लागेल भोसडीचं आता . नायतर तो कल्लू मामा घोडा लावेल. (कल्लू मामा हे त्याचा बॉस श्रीयुत कुलकर्णी याचं लोकप्रिय खाजगी नाव होतं . ) " माणसाला झोप पाहिजे . सालं हे काय जगणं आहे ? बाकीचे सेल्समन कसे आरामात जगतात . आमचा बॉस आम्हाला कुत्र्यासारखं पळवतो . कस्टमर लोक बी आजकाल भल्या सकाळचीच अपोईन्टनट्स देतात . च्यामारी एवढं कर्ज फिटू दे . गांडीवर लाथच मारतो त्या कल्ल्याच्या . " आपण बॉसच्या गांडीवर लाथ मारत आहोत असे चित्र मिटलेल्या डोळ्यांसमोर उभे करीत गजा थोडावेळ स्वतःशीच हसत राहिला . आपण बॉसच्या तोंडावर राजीनामा फेकतो आहोत आणि बॉसचे तोंड म्हशीच्या ** सारखे झाले आहे असे स्वप्नरंजन तो करू लागला . " आय्घाला तासा तासाला फोन करून रिपोर्ट घेतो . त्यात कानाने अधू . ओरडून ओरडून घसा फाटतो . अरे बापरे …आता मात्र उठायलाच पायजे . पाचची गाडी पकडायची आहे ."
त्याने स्वतः मधेच डोकावून वेळ बघितली . अरे बापरे ! हे काय ? साडे पाच वाजले . आता तर साडेचारचा अलार्म
वाजला होता . पाच मिनिटे डोळे मिटले तेवढ्यात एक तास झाला ?
आता पुढची गाडी पावणे सहाला . म्हणजे मरणाची घाई करावी लागणार . चला , आवरू आता झटपट . पण हे काय ? त्याला कणभरही हलता येईना . फक्त डोक्यातून प्रकाश चालू बंद होतोय . नाहीतरी आता कितीही घाई केली तरी कल्लू चढायचं ते चढणारच . अजून पर्सल्स प्याक करायचे आहेत . आणि डिलिवरी बॉयने पाचच्या गाडीची वाट पाहून पार्सल न पोहोचल्याचा रिपोर्ट सुद्धा दिला असेल . सिक लिव्ह टाकावी का ? पण बॉस साला विश्वास नाय ठेवणार . इन्शुरनस कंपनीचा डॉक्टर घेऊन घरीच धडकायचा . आणि तो डॉक्टरही साला , त्याला कोणी आजारी वाटतच नाही . 'काही धाड भरलेली नाही' असा शेरा ठोकून देईल . आणि आजच्या घडीला काय खोटं आहे का ते ? मला तर उलट चार्ज झाल्यासारखं वाटतंय . हं , ब्याटरी जरा तापली आहे इतकंच . पण त्या माणसाच्या डॉक्टरला ते काय कळणार ?
असा विचार करीत गजा कितीतरी वेळ पहुडला होता . इतक्यात त्याला दारावर बांगड्या घातलेल्या चिरपरिचित हाताची थाप ऐकू आली . " गजा रे ? उठ बाळा आता . साडेसहा वाजलेत . कामावर नाही जायचं का तुला ?" काय त्या माउलीच्या आवाजात ओलावा होता ! गजा उत्तर देताना जरा अडखळला . आवाज त्याचाच असला तरी फोन मधून यावा तसा विचित्र येत होता . " हं , उठतोय अक्का ." गजा उत्तरला . त्याला पुढे बोलायचे होते पण प्राप्त परिस्थितीत अधिक बोलणे त्याला श्रेयस्कर वाटले नाही . लाकडी दरवाज्यातून त्याच्या आवाजातील मेटालिक झालर आईला कळली नसावी अशी त्याला आशा होती . पण त्याच्या तुटक उत्तराने घरातील बाकीचे लोकही साशंक झाले . " गजा ; काय चाललंय तुझं आत ?" गजाचा बाप करवदला , थोडावेळ वाट पाहून पुन्हा काळजीने हाका मारू लागला . " गजा , अरे गजा भोसडीच्या सकाळी सकाळी फुल टाइट झाला कि काय रे ?"गजाच्या खोलीला मागच्या बाजूनेही एक दरवाजा होता . गजाची बहिण शारदा तो दरवाजा वाजवू लागली ," गजू दादा , बरं वाटत नाही काय रे ?" ती काळजीने विचारू लागली . " उठतोय दोन मिनिटात ." आपल्या आवाजातील यांत्रिक कंप लक्षात येऊ नये म्हणून गजा हळू हळू एक एक शब्द उच्चारीत म्हणाला . हे ऐकून त्याचा बाप बिडी प्यायला निघून गेला . पण शारदाने काही गजाचा पिच्छा सोडला नाही . "गजु दादा, दार उघड बरं आधी ." शारदा विनवू लागली . गजाचा दार उघडायची अजिबात इच्छा नव्हती . प्रवासातील सवयीनुसार दोन्ही दारे त्याने आतून बंद करून घेतले होते ; याबद्दल त्याने मनातल्या मनात स्वतःलाच शाबासकी दिली .
पण आता उठायलाच पाहिजे . आता हळूहळू उठावे, अंथरुणातून बाहेर पडावे , कपडे बदलावेत , चहा ढोसावा आणि मग.... , त्याच्या स्क्रीन वर आजच्या तारखेच्या अपोइंटमेंट्स हाइलाइट झाल्या . आता उठले म्हणजे हे चित्र विचित्र भास ही लगेच नाहीसे होतील . पण प्रत्यक्ष हालचाल केल्याशिवाय गोष्टी घडत नसतात आणि आपण स्वतःला हालचाल करण्याची कामांड देऊनही काहीही
हालचाल करू शकत नाही हि गोष्ट त्याला लवकरच कळून चुकली .
'सोपं आहे , प्रथम अंगावरची चादर बाजूला करायची , नंतर पाय उचलून अलगद जमिनीवर ठेवायचे , त्याचवेळेस डोके वर उचलून आधी पलंगावर उठून बसायचे , मग आळस झटकून उभे राहायचे .' त्याने स्वतःसाठी आज्ञावली तयार केली . पण त्यानुसार काहीच घडेना . त्याचे हात आणि पाय त्याच्या
चपट्या चौकोनी शरीरालाच जखडले गेले होते . त्याचे अंग चांगलेच तापले होते . कोणीतरी चार्जिंग वायर डिस्कनेक्ट करण्याची गरज होती . ' आजारामुळेच मनात असे भलते सलते विचार येतात . सततच्या प्रवासानेच माझा घसा बसलाय . म्हणून तर आवाज
असा फोनमधून आल्यासारखा येतोय . ' त्याने स्वतःची समजूत घातली . ' पण म्हणून असे काहीच न करता झोपून राहणे बरे नाही '. त्याने स्वतःशी विचार केला आणि उठून बसण्याचा पुन्हा एकदा निकराने प्रयत्न केला .
नेहमीप्रमाणे उजव्या कुशी वरून उठता येत नसेल तर डाव्या कुशीवरून उठण्याचा एकदा प्रयत्न करू , म्हणजे मग भिंतीकडे तोंड होईल . नंतर १८० डिग्रीच्या कोनातून वळले कि पलंगावरून उतरता येईल . मग उजवीकडे वळून दरवाजा उघडायचा आठ फुट सरळ चालून पुन्हा उजवीकडे वळायचे म्हणजे स्वयंपाक घरात जाता येईल . त्याच्या स्क्रीनवर पटापट नेवीगेशन डाऊनलोड होऊ लागले . पण डाव्या कुशीवरही वळता येईना . मग काही वेळ तो स्वस्थ पडून राहिला . हळूच खिडकीकडे पहिले . सात वाजले असतील तरी पावसाळी हवेमुळे अजून पहाट असल्यासारखेच वाटते आहे . त्याच्या मेमरीत अचानक सविताचा फोटो तरळला . अशा वेळी खरे तर तिच्याबरोबर हातात हात घालून दूरच्या रानात फिरायला जाता आले असते तर काय बहार आली असती . अचानक त्याच्या मेमरी कार्ड मधील सॉंग लिस्ट मधून ' तेरी दो टकीयोकी नोकरीमे मेरा लाखो का सावन जाये ' हे गाणे वाजू लागले . त्याने निकराने पॉज बटन दाबले . हा आवाज बाहेर गेला तर गोंधळ व्हायचा असा त्याने विचार केला . पण पुन्हा पुन्हा प्रयत्न करून सुद्धा उठून बसणे काही त्याला जमेना . ' दोन तगडे माणसं असते तर पुरले असते . अप्पांना बोलवावे आणि शेजारच्या बाळूकाकांना . ' त्याचा मनात कल्पना तरळली . आता साडेसात तर नक्कीच झाले असतील . ऑफीस उघडलेही असेल एव्हाना कल्लू खवळला असेल . असा विचार मनात यायला आणि काल्लूचा फोन यायला एकाच गाठ पडली . त्याच्या हृदयाची धडधड इतकी वाढली कि आपण व्हायब्रेटींग मोड वर आहोत कि काय अशीच शंका त्याला आली . फोन
रीसीव्ह करण्याचे धाडस काही त्याला झाले नाही . पूर्ण रिंग वाजून फोन बंद झाला . त्याच्या कपाळावर
मिस कॉल चे चिन्ह उमटले . रिंग टोन बंद झाल्यावर मात्र आपण फोन उचलला असता तर बरे झाले असते असे त्याला वाटू लागले . काहीतरी थाप मारता आली असती . आता फोन न उचलल्यामुळे कल्लूला संशय येणार आणि तो थोड्याच वेळात घरी कोणालातरी पाठविणार . त्याच्या आत उठले पाहिजे आणि बाहेर पडले पाहिजे . अन्यथा सगळेच बिंग फुटेल . पण जोरदार प्रयत्न करूनही त्याला इंचभरही सरकत येईना . मघाशी फोनच्या व्हयब्रेशन मुळे तो थोडाफार सरकला होता इतकेच . त्याला अचानक किंचाळावे असे वाटू लागले . कोणाला तरी मदतीला बोलवल्या शिवाय गत्यंतर नाही हेही त्याला आतून जाणवले . तरीही तो शांत राहिला . ' बी पोझीतीव्ह , बी काम .' त्याने ' हाऊ टू बी सक्सेसफुल ' या त्याच्या आवडत्या पुस्तकातील वाक्ये मनाशी म्हटली . आणीबाणीच्या परिस्थितीत तो नेहमीच या सूत्रांचे स्मरण करायचा . त्यानेही फरक पडला नाही तर सरळ 'भीमरूपी महारुद्र ' हे मारुती स्तोत्र म्हणायला सुरुवात करायचा . आताही त्याने तेच केले . पण दरवेळेस त्याची जी लागायची ती लागायचीच . याही वेळेस तेच झाले . त्याच्या घराची डोअर बेल वाजल्याचे त्याला ऐकू आले . ' नक्कीच ऑफिस मधले कोणीतरी आले असणार .' त्याने कानोसा घेतला . मिनिटभर कोणीच दरवाजा उघडला नाही . त्याला वेडी अशा वाटू लगलि. त्याच्या स्क्रीनवरील घड्याळातील सेकंदाचे दोन टिंब लुकलुकताना तो बारकाईने बघू लागला . पण अर्थातच एक दोन मिनिटातच नेहमीप्रमाणे त्याच्या बहिणीने दरवाजा उघडला . कोण आले आहे हे कळायला त्याला त्या व्यक्तीने उच्चारलेला एक शब्दच पुरेसा होता . हा काल्लूचा चमचा जोशा होता . जोशा त्याचा सिनियर होता आणि गजावर नेहमी खार खाऊन असे. च्यामारी , एकदिवस जरा उशीर काय झाला , हे लगेच पंचामामा करायला आले . जसे काय यांचे स्यम्पल चे पार्सल आणि पैसे घेऊन पळूनच जाणार आहे . आले लगेच घरच्या माणसांसमोर उद्धार करायला . बाकीचे सारे जसे साव आणि मीच काय तो चोर ! एखाद्या शिपायाला पाठवायचे लईच अडचण असेल तर . जोशा मुद्दाम आला बापासमोर माझी लाज काढायला . म्हणजे आम्ही फार मोठा गुन्हा केलाय आणि हे आले आता फौजदार .
माझ्यावर आज जो प्रसंग गुदार्लाय तो जर जोशावर नायतर काल्लूवर गुदरला असता तर उलट त्यांनी त्याचाही भांडवल केलं असतं . म्हणजे बघा आम्ही कशा कंपनीसाठी
खस्ता खातोय …. हळूहळू जोशाच्या बुटांचा आवाज जवळ येऊ लागला . पाठीमागच्या खोलीतून बहिण शारदा हलक्या आवाजात कुजबुजली . " दादा , जोशी साहेब अलेत. " " माहित आहे मला ." गजा हळू आवाजात उत्तरला . एवढ्या हळू आवाजात कि तो पलीकडच्या खोलीत शारदाला ऐकूही गेला नसणार . इतक्यात त्याच्या वडिलांनी पुढचे दार वाजविले. "गजा, अरे गजा .जोशी साहेब आलेत बघ , त्यांना बोलायचं तुझ्याशी . तू आज महत्वाची ऑर्डर मिस केली म्हणे , आम्ही काय सांगणार यावर म्हणा , दर उघड आणि तूच बोल " वडील दारावर थाप मारत असता आई मात्र जोशाला म्हणत होती ," आजारी आहे हो पोर . नाहीतर असं व्हायचं नाही . कायम बिझनेसचा विचार डोक्यात . पहाटेच उठून फिरती वर जातो . उलट मीच रागावते त्याला कधी कधी . पण तो म्हणतो , कंपनीचा फायदा झाला पाहिजे . खाल्ल्या मिठाला जगलं पाहिजे . " यावर जोशा साळसूदपणे म्हणत होता ,"मलाही तेच वाटतंय . आजारी असल्याशिवाय सरोदे असे करायचे नाहीत . म्हणून तर काळजीने मी स्वतः आलो . सरोदे , अहो दर उघडतंय ना ? मला जर खाजगी बोलायचंय ." मी आत उठण्याचा प्रयत्न करीत होतो . पण जमेचना . तसाच झोपल्या झोपल्या उत्तरलो ," जोशी साहेब , मी उठतोच आहे थोड्या वेळात . खरे म्हणजे मी अजून अंथरुणातच आहे आणि उठण्याच्या प्रक्रियेच्या ऐन मध्यावर आहे . मला माहित आहे कि असे वागणे माझ्याकडून तुम्हाला अपेक्षित नसेल . पण कधीकधी माणसाला असे क्षणिक झटके येतात क्वचित . याचा अर्थ तो माणूस आळशी आहे असा होत नाही . उलट हीच वेळ असते त्याला समजून घेण्याची . त्याने यापूर्वी केलेली सेवा विशेषतः अशाच वेळी विचारात घ्यावी . माणूस म्हणजे यंत्र नसते हो . पण कधीकधी माणसाचाही अक्षरशः मोबाईल फोन होऊ शकतो हि शक्यता आपण विचारातच घेत नाही . तेव्हा तुम्ही थोडावेळ अप्पांबरोबर गप्पा मारत बसा . मी बघतो उठता येतं कि नाही ते . " मी असा बोलत असताना मागच्या खोलीतून शारदा चक्क हुंदके देत रडायलाच लागली . यात रडण्यासारखे काय होतं ? कमाल आहे या बाईची . आता तिचं लग्न होत नाही म्हणून हिला कधीही रडू येतं . आजारी पडलं म्हणून काही मला लगेच नोकरीवरून काढून थोडेच टाकणार आहेत ?
जोशा मात्र उसळलाच ," ऐकलंत सरोदे काय म्हणताहेत ते ? एक शब्द तरी कळला का ? आणि वर सांगताहेत कि अजून अंथरुणातच लोळत
पडले आहेत . मला गप्पा मारीत बस म्हणतात . " जोशा संतापाने अप्पान्शीच तावातावाने बोलू लागला .
" शांत व्हा जोशीसाहेब , बहुदा तापात बरळतोय गजा . मी आता माणूस बोलावून दर्वाज्च्या बिजागीर्याच तोडतो ." असे म्हणून अप्पा शेजारच्या बाळूकाकांना स्क्रू ड्रायवर आणि हातोडा घेऊन बोलावू लागले . शारदाही डॉक्टरांना बोलाविण्यासाठी बाहेर निघून गेली .मी गुपचूप काय होतं आहे त्याची वाट बघत पडून राहिलो . थोड्यावेळात आडदांड बाळूकाका त्यांचे हत्यारे घेऊन आले . असले कामं करण्यात त्यांना भलताच उत्साह वाटायचा . दरवाजाच्या बिजागीर्या खोलण्याचा आवाज येऊ लागला . बिजागीर्या सुट्या झाल्यावर त्यांनी अप्पांच्या मदतीने दरवाजा हळूहळू दूर केला . समोर मी पलंगावर पडलेलो होतो . मला बघून अप्पा आणि बाळूकाकांची बोबडीच वळाली .
" अप्पा काय झालं तुम्हाला ?तुम्ही घाबरू नका . लगेच काही माझी नोकरी जात नाही . तुम्ही आणि बाळूकाका मला आधार देऊन हळूहळू उभे करा पाहू . मग मी बोलतो जोशी साहेबांशी . काय आहे या गर्मीने माझे हात पाय अंगालाच चिकटले आहेत . " मी म्हणालो . जोशा तर मला बघून उडालाच . लगेच रामरक्षा स्तोत्र पूटपुटु लागला . अचानक वळून दरवाजाच्या दिशेने पाळला . त्याला जाऊ देणे योग्य नव्हते . माझी बाजू ऐकून न घेता जर तो गेला असता तर त्याने नक्कीच एकाचे दोन करून कल्लुचे कान भरले असते . या जोशाला बायकांचा भारी नाद . आता शारदा असती तर बरं झालं असतं . बरोबर पाघळला असता गडी . तिने बरोबर पटविले असते त्याला . " जोशी साहेब , अहो जरा थांबा तरी " मी जोशाला हाका मारू लागलो . जोशा काही थांबला नाही . भूत बघितल्यासारखा धूम पळाला . इतक्यात माझे लक्श आई कडे गेले . ती चहाचा ट्रे घेऊन आत येत होती . मला पाहून किंचाळलीच . तिच्या हातातला चहाचा ट्रे खाली पडला . कप फुटले आणि चहाचा ओघळ पलंगापर्यंत आला . उघड्या दरवाजाच्या समोरच्या गोदरेजच्या कपाटाच्या आरशात मला माझे नवे रूप दिसले . माझे रुपांतर पूर्णपणे एका महाकाय मोबाईल फोन मध्ये झाले होते . ठीक आहे न मग ! चांगलेच आहे कि ! त्यात एवढे मनाला लाऊन घेण्यासारखे काय होते ? ………. क्रमशः